शपथविधीनंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या नाट्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण बैठका पार पडणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची देखील बैठक बोलावली आहे. तर अजित पवारांच्या कार्यालयाचे देखील मुंबईत उद्घाटन करण्यात येणार आहे. शंघाई सहयोग परिषदेच्या होणाऱ्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन सहभागी होणार […]

शपथविधीनंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या नाट्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण बैठका पार पडणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची देखील बैठक बोलावली आहे. तर अजित पवारांच्या कार्यालयाचे देखील मुंबईत उद्घाटन करण्यात येणार आहे. शंघाई सहयोग परिषदेच्या होणाऱ्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन सहभागी होणार आहेत. बैठकीत चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सुद्धा सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेस सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number