मंत्रिमंडळ विस्तार हा ९ जुलै रोजी होणार

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: अजित पवार यांच्यासह ८ आमदारांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता उरलेला सर्व मंत्रिमंडळ विस्तार हा ९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवारांची बैठक झाली. त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, तटकरेही उपस्थित होते. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीवर कायदेशीर बाबींवर […]

मंत्रिमंडळ विस्तार हा ९ जुलै रोजी होणार

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: अजित पवार यांच्यासह ८ आमदारांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता उरलेला सर्व मंत्रिमंडळ विस्तार हा ९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवारांची बैठक झाली. त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, तटकरेही उपस्थित होते. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते.

या बैठकीवर कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याचं समजतंय. आता अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर रवाना झाले. अजित पवारांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर विधीमंडळ गटनेते पदावर जयंत पाटील अजित पवारांकडून आज काही आमदारांना संपर्क केला जातोय. काल राजभवनात शपथ घेताना एनसीपीचे दोन तृतीअंश आमदारांनी स्वाक्षरी केली असा दावा अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी केलीय. आता अजित पवारांसोबत आणखी तीन ते चार आमदार येतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

एकीकडे अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना संपर्क केला जातोय.. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या कार्यालयातही महत्त्वाची बैठक सुरु आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित आहेत.. पक्षातल्या फुटीनंतर पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचं कायदेशीर कामकाज पाहणारे शिवाजीराव गर्जेही राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झालेत.

मात्र सुप्रिया सुळेंनी अद्याप त्यांना भेट दिलेली नाही.. एका केबिनमध्ये त्यांना बसवून ठेवण्यात आलंय.. शिवाजीराव गर्जे काल दिवसभर अजित पवारांसोबत होते.. ऐवजी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर दुसरकडे प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आलंय. राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेता आणि प्रतोद याबद्दल तांत्रिक बाजू मांडण्यासाठी अजित पवार यांची आज दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number