जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महिला खासदारांनंतर बालहक्क संरक्षण आयोगानं शनिवारी भायखळा तुरुंगाची पाहणी केली.
मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या महिला कैद्यांनी लहान मुलांचा वापर केला होता, का याबाबत चौकशी झाली. त्यावेळी तुरुंगातील लहान मुलं आणि गर्भवती
महिलांच्या सुरक्षेतही बालहक्क संरक्षण आयोगाला त्रुटी आढळून आल्यात.
याबाबतचा अहवाल 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. कैदी मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर महिला कैदी आक्रमक झाल्या होत्या.
पकडल्यास कारवाई होईल म्हणून त्यांनी ढाल म्हणून लहान मुलांचा वापर केला, असा आरोप आहे. या घटनेची सत्यता पडताळण्याकरता बालहक्क संरक्षण आयोगच्या
5 सदस्यांनी भायखळा जेलला भेट दिली आणि तुरुंगातील मुलांची विचारपूस करत, अधिकाऱ्यांची चौकशी केली.