लग्नात कोल्हापुरी फेटा बांधून चोराने केली 4 लाखांच्या दागिन्यांची चोरी

डोक्यावर कोल्हापुरी फेटा, पारंपरिक पोशाख आणि चेहऱ्यावर हसरा भाव घेऊन या लग्नसमारंभात महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्याला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.

लग्नात कोल्हापुरी फेटा बांधून चोराने केली 4 लाखांच्या दागिन्यांची चोरी

कोल्हापूर: लग्नसमारंभ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो आनंद, दोन कुटुंबांतील उत्साह, गोडवा आणि पाहुणचार. मात्र, कोल्हापूर शहरातील एका लग्नात पाहुणचार घेऊन चोराने चोरी केल्यामुळे सर्वांची झोप उडाली आहे. डोक्यावर कोल्हापुरी फेटा, पारंपरिक पोशाख आणि चेहऱ्यावर हसरा भाव घेऊन या लग्नसमारंभात महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्याला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या चोरट्याचे नाव बाळासो उर्फ अजित पाटील असून त्याने कोल्हापूरसोबतच सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील लग्नसमारंभात चोरी केली होती. 

नेमकं प्रकरण काय?

ही घटना कोल्हापूर शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील लग्नसोहळ्याची आहे. डोक्यावर कोल्हापुरी फेटा, पारंपरिक पोशाख आणि चेहऱ्यावर हसरा भाव घेऊन बाळासो उर्फ अजित पाटील या चोरट्याने सर्वांसोबत हसत-खेळत बोलला. त्यासोबतच कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने हा चोर लग्नसमारंभात वावरू लागला. यादरम्यान, त्याने जेवणाचा आस्वाद देखील घेतला, इतकंच नाही तर पाहुण्यांसोबत फोटोही काढले. त्यादरम्यान या चोरट्याने परिस्थितीचा फायदा घेत घरातील दागिने लंपास केले. 

या चोरट्याने घरात जाऊन तब्बल 4 लाख रुपयांची किंमत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. आश्चर्याची बाब म्हणजे लग्नाचे वातावरण असल्यामुळे कोणालाही याची जाणीव झाली नाही. आपल्या गैरहजेरीत काहीतरी गडबड सुरू आहे, हे कुटुंबीयांना न समजल्यामुळे चोरी घडली. चोरी झाल्याची घटना समजताच संबंधित कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

थोड्याच वेळात आरोपी जेरबंद:

तक्रार दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित तपास सुरू केला. त्यासोबतच, गुन्हे शाखेच्या पथकाने लग्नातील सीसीटीव्ही फुटेज, पाहुण्यांची उपस्थिती आणि इतर पुराव्यांची सखोल तपासणी करून थोड्याच वेळात आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला जाब विचारल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि हे देखील मान्य केले की यापूर्वी त्याने इतर ठिकाणी अशा प्रकारची चोरी केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून चोरी केलेले बहुतांश दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यासोबतच, पोलिसांनी नागरिकांना जागरूक राहण्याचा इशारा दिला आहे. लग्नसोहळे, सण-उत्सव अशा कार्यक्रमांमध्ये अनोळखी लोकांवर जास्त लक्ष ठेवणे, सीसीटीव्हीच्या मदतीने अनोळखी लोकांवर नजर ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number