भारतातील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतातील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत. पण या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १७ ऑगस्टपर्यंत दाखल करता येतील. अर्जांची छाननी १८ ऑगस्ट रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २१ […]

भारतातील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतातील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत. पण या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १७ ऑगस्टपर्यंत दाखल करता येतील. अर्जांची छाननी १८ ऑगस्ट रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. यानंतर ५ सप्टेंबर २०२३ रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. मतमोजणी ८ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.

सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

झारखंड : धुमरी
केरळ : पुथुप्पली
त्रिपुरा : बोक्सानगर
त्रिपुरा : धनपूर
पश्चिम बंगाल : धुपगुरी (एससी)
उत्तर प्रदेश : घोसी
उत्तराखंड : बागेश्वर (एससी)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number