Bus Accident : छावणी उड्डाणपुलावर खासगी बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, तर बसमधील 35 कामगार जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर गुरुवार, 2 जुलै रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुसऱ्या शिफ्टनंतर वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीतील कामगारांना घरी घेऊन जाणारी खासगी बस उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीवर जोरात धडकली. या भीषण अपघातात बस चालक जाधव यांचा मृत्यू झाला असून सुमारे 35 कामगार गंभीर जखमी झाले […]

Bus Accident : छावणी उड्डाणपुलावर खासगी बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, तर बसमधील 35 कामगार जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर गुरुवार, 2 जुलै रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुसऱ्या शिफ्टनंतर वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीतील कामगारांना घरी घेऊन जाणारी खासगी बस उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीवर जोरात धडकली. या भीषण अपघातात बस चालक जाधव यांचा मृत्यू झाला असून सुमारे 35 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, चालक बसच्या केबिनमध्ये अडकला होता. नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून सर्व जखमींना विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : Ambenali Ghat : पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number