Kalyan News: कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नाल्यात जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नाल्यात जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

Kalyan News: कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नाल्यात जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

कल्याण शहरात रविवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेल्वे स्थानक परिसरातील गजबजलेल्या भागात नाल्यात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.मिळालेल्या माहितीनुसार, स्थानकाजवळील सांडपाण्याच्या मोठ्या नाल्यातून सकाळच्या सुमारास तीव्र दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी खाली पाहिले असता खोल भागात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. तत्काळ याची माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे देण्यात आली.

पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासात हा प्रकार संशयास्पद असल्याचे दिसून आले आहे. संबंधित महिलेला आधी नाल्यात टाकून त्यानंतर ज्वलनशील पदार्थाने पेटवण्यात आले असावे, अशी शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे, असा दाट संशय आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. ती स्थानिक रहिवासी आहे की बेवारस, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरातील दुकाने आणि आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून नागरिकांचीही चौकशी केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number