दाढी करताना आग होतेय ? ‘हे’ आहेत घरगुती उपाय

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : महिलांना ज्या प्रकारे मेकअप कर्णयची हौस असते त्याच प्रकारे पुरुषांना वेळोवेळी आपली दाढी करायला खूप आवडते. काहींना दाट दाढी आवडते तर काहींना दाढी आवडतच नाही. पण दोन्ही प्रकारांमध्ये वेळोवेळी दाढी करणे हे त्यांना भागच असते. मात्र बऱ्याच वेळा दाढी केल्यानंतर लालसरपणा किंवा त्वचेची जळजळ होते.तर कधी यामुळे ऍलर्जी सुद्धा […]

दाढी करताना आग होतेय ? ‘हे’ आहेत घरगुती उपाय

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : महिलांना ज्या प्रकारे मेकअप कर्णयची हौस असते त्याच प्रकारे पुरुषांना वेळोवेळी आपली दाढी करायला खूप आवडते. काहींना दाट दाढी आवडते तर काहींना दाढी आवडतच नाही. पण दोन्ही प्रकारांमध्ये वेळोवेळी दाढी करणे हे त्यांना भागच असते. मात्र बऱ्याच वेळा दाढी केल्यानंतर लालसरपणा किंवा त्वचेची जळजळ होते.तर कधी यामुळे ऍलर्जी सुद्धा होऊ शकते. अशा परिस्थिती काय उपाय करावे जाणून घ्या:

कोरफड :

कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतो, या दाढीमुळे निर्माण होणारी पुरळ आणि चिडचिड कमी करण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी दाढी करून झाल्यानंतर, कोरफडीचा गर पूर्णपणे चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.


बर्फ :

दाढी करताना बरीच वेळा रक्तस्त्राव सुरू होतो. त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, जळजळ आणि जखमा होतात. या समस्यांपासून बर्फ आराम देऊ शकतो. यासाठी दाढी करून झाल्यावर बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मसाज करावा.


हळद :

दाढी केल्यानंतर संसर्ग दूर करण्यासाठी हळदीचे पाणी वापरू शकता. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेचे संक्रमण दूर करण्यात मदत होते, तसेच त्वचेची जळजळ देखील कमी होते. यासाठी पाण्यात हळद मिसळून चेहऱ्याला लावावी.


ऍपल सायडर व्हिनेगर :

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे दाढी करताना झालेल्या जखमा आणि संसर्गापासूनज बचाव करण्यास मदत होते.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number