बुरहान वाणीचा साथीदार ठार

वृत्तसंस्था, रामपूर   जम्मू-काश्मीरमधील रामपूर सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं पाकपुरस्कृत घुसखोरीचा डाव उधळून लावला. भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात सहा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले असून त्यात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट्ट ऊर्फ अबू झरारचाही समावेश आहे.   सबजार हा बुरहान वानीचा साथीदार होता. नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं लक्षात येताच भारतीय जवानांनी गोळीबार केला. घुसखोरांनीही त्यास […]

बुरहान वाणीचा साथीदार ठार

वृत्तसंस्था, रामपूर

 

जम्मू-काश्मीरमधील रामपूर सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं पाकपुरस्कृत घुसखोरीचा डाव उधळून लावला. भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात सहा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले असून त्यात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट्ट ऊर्फ अबू झरारचाही समावेश आहे.

 

सबजार हा बुरहान वानीचा साथीदार होता. नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं लक्षात येताच भारतीय जवानांनी गोळीबार केला. घुसखोरांनीही त्यास प्रत्युत्तर देत गोळ्या झाडल्या. या चकमकीत चार दहशतवादी मारले गेल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

कोण आहे सबजार अहमद?

मागच्या वर्षी जुलै महिन्यात घेतली बुरहान वाणीची जागा

‘सब डॉन’ म्हणून काश्मीर खो-यात ओळख

त्रालमध्ये बुरहानसाठी केलं ग्राऊंड वर्क

सबजार अहमद बुरहान वाणीचा विश्वासू साथीदार

काश्मीर खोऱ्यात बुरहान वाणीचा वारसदार म्हणून ओळख

दोन वर्ष केले वाणीसोबत काम

हिजबुल मुजाहिदीनच्या संपूर्ण नेटवर्कची त्याला माहिती

सबजार अहमदवर 10 लाखाचे इनाम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number