पावसाळा लागून महिना उलटला तरी देखील अद्यापही मराठवाड्यामध्ये पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचेमुळे पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून याचा प्रत्यय रविवारी मराठवाड्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील भरलेल्या बैलबाजारात आला आहे. सध्या जनावरांना चारा आणि पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे जनावरे विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसत होती. मात्र खरीददार फिरकत नव्हते. यामुळे जनावरांचे दरही घटले असून याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने आता शासकीय छावण्या सुरू करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.