जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर आजकालच्या जीपीएससारख्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसालाही रस्ते सापडत नाहीत. मात्र, कोल्हापूरच्या औरवड गावात एक बैल चक्क कोणत्याही चालकाविना सामान घरी पोहचवतो. राज नावाचा बैल दररोज दीड किलोमीटर अंतर कापून एकटाच सगळ्या सामानाची ने-आण करतो, तेदेखील वाहतुकीचे सगळे नियम पाळून. राज बैल हा सगळ्याच्याच चर्चेचा विषय ठरलाय. प्रेमामुळे जनावरंदेखील […]
आजकालच्या जीपीएससारख्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसालाही रस्ते सापडत नाहीत. मात्र, कोल्हापूरच्या औरवड गावात एक बैल चक्क कोणत्याही चालकाविना सामान घरी पोहचवतो.
राज नावाचा बैल दररोज दीड किलोमीटर अंतर कापून एकटाच सगळ्या सामानाची ने-आण करतो, तेदेखील वाहतुकीचे सगळे नियम पाळून. राज बैल हा सगळ्याच्याच चर्चेचा विषय ठरलाय.
प्रेमामुळे जनावरंदेखील माणसाळतात याचा प्रत्ययच राजकडे बघून येतो.