जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या
राजीनाम्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देण्याचं सत्र सुरू केले.
स्वाभिमानी संघटनेचे नेते राणा चंद्रशेखर चंदन आणि जिल्हाध्यक्ष भगवानराव मोरे यांनीही शासकीय दुष्काळ निवारण समितीच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला.
त्यांनी बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकरांची यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला.