Buldhana Accident News : काही क्षणात सगळं संपलं…; जवानाच्या डोळ्यांसमोर पत्नीचा दुर्दैवी अंत

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा–लोणार मार्गावर झालेल्या भीषण अपघातात भारतीय सैन्यातील जवान प्रमोद गवई यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Buldhana Accident News : काही क्षणात सगळं संपलं…; जवानाच्या डोळ्यांसमोर पत्नीचा दुर्दैवी अंत

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा-लोणार मार्गावर सोमवारी घडलेला एक भीषण अपघात संपूर्ण परिसराला हादरवून गेला. नागझरी नाल्याजवळ, क्षणात आयुष्य बदलून टाकणारी ही घटना घडली आणि आनंदाच्या प्रवासावर निघालेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

राहेरी बुद्रुक येथील रहिवासी आणि सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असलेले प्रमोद सुरेश गवई हे सुट्टीवर घरी आले होते. पत्नी सौ. कोमल गवई आणि लहान चिमुकल्या मुलासोबत ते बुलेट दुचाकीवरून सासरवाडी लोणारकडे निघाले होते. घरात आनंद, मनात भविष्याची स्वप्ने आणि चेहऱ्यावर समाधान होते. मात्र पुढील काही क्षणांत हे सर्व कायमचे हरपणार आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती.

हेही वाचा: Raj Thackeray on Devendra Fadnavis : मुलं बेपत्ता होण्याच्या प्रमाणात 30 टक्के वाढ; राज ठाकरेंचे फडणवीस सरकारला खडेबोल, विरोधकांनाही सुनावलं

मार्गावर समोर चालणाऱ्या अज्ञात बैलगाडीला दुचाकीचा अचानक धक्का लागला. दुचाकी जाग्यावच थांबली आणि मागे बसलेल्या कोमल गवई रस्त्यावर कोसळल्या. त्या उठण्याआधीच समोरून जालन्याकडे जाणारा एक भरधाव ट्रक क्षणात त्यांच्या अंगावरून गेला. काही कळायच्या आतच कोमल यांचा जागीच मृत्यू झाला. काही सेकंदांचा हा प्रसंग आयुष्यभराची जखम देऊन गेला. अपघातात प्रमोद गवई आणि त्यांचा लहान मुलगा थोडक्यात बचावले. मात्र डोळ्यांसमोर पत्नीचा मृत्यू पाहण्याची भीषण वेदना प्रमोद यांच्या वाट्याला आली. मदतीसाठी आलेले लोक, रस्त्यावर पसरलेली शांतता आणि त्या क्षणात संसाराची कोसळलेली स्वप्ने हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आला आहे. ट्रक चालक अद्याप फरार असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सैन्यातून सुट्टी मिळाल्याने कुटुंबासोबत काही दिवस आनंदात घालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रमोद गवई यांच्यासाठी ही सुट्टी आयुष्यभराची वेदना ठरली. दोघांच्या संसाराचे क्षण आठवणीतच राहिले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पंचक्रोशीतील नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना हादरवून टाकले असून, एका आनंदी कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या शोकांतिकेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: IND vs SA 3rd T20 : गिलचा पत्ता कट? पराभवानंतर टीम इंडिया 'या' खेळाडूला देणार ओपनिंगची संधी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number