Buldhana News: कृषी कार्यालयाचा सावळा गोंधळ! 75 वर्षाची आजी चढतेय 100 पायऱ्या,कारण वाचून तुमचाही होईल संताप

75 वर्षांच्या माउलीला तिसऱ्या मजल्यावर चढण्यासाठी पायऱ्यांवर बसत-बसत जावं लागल्याचे दृश्य समोर आलं आहे. 

Buldhana News:  कृषी कार्यालयाचा सावळा गोंधळ!  75 वर्षाची आजी चढतेय 100 पायऱ्या,कारण वाचून तुमचाही होईल संताप

सरकारी काम लवकर होणं म्हणजे भाग्यच म्हणायला लागेल. पण लवकर आणि सोयीस्कर, सुखकररित्या होईल ते सरकारी काम तरी कसलं? या सरकारी कामासाठी खूप चकरा माराव्या लागतात. यामध्ये सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हालदेखील होतात. असाच काहीसा प्रकार घडलाय बुलढाण्यात. 

बुलढाण्याच्या मेहकरमधून एक अत्यंत विदारक आणि संतापजनक चित्र समोर आलं.  जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला आज सरकारी कार्यालय गाठण्यासाठी चक्क गुडघे घासून मरण्याची वेळ आली आहे.  75 वर्षांच्या माउलीला तिसऱ्या मजल्यावर चढण्यासाठी पायऱ्यांवर बसत-बसत जावं लागल्याचे दृश्य समोर आलं आहे. 

हेही वाचा – Samay Raina Girlfriend Photo: रणवीर अलाहबादियानंतर समय रैनाकडूनही 'गर्लफ्रेंड'चा खुलासा; चाहत्याच्या आग्रहास्तव शेअर केला फोटो 

तालुका कृषी कार्यालय सध्या भाडेतत्त्वावरील इमारतीत तिसऱ्या मजल्यावर कार्यरत आहे.मात्र, इमारतीतील  लिफ्ट सातत्याने बंद असल्याने शेतकऱ्यांना सुमारे 100 पायऱ्या चढून कार्यालयात जावं लागत आहे.यामुळे विशेषतः वयोवृद्ध व शारीरिकदृष्ट्या अशक्त, दिव्यांग शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – Heatwave Alert : उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी 

ही घटना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊन मेहकर येथे घडल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कृषी कार्यालयात पीक विमा अर्ज, पीक नोंदणी, अनुदान योजना, बियाणे व खत वितरण, पीक नुकसानीची नोंद, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार ये-जा करावी लागते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number