जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
बुलडाण्यातील आरे गावात एक धक्काधायक प्रकार समोर आला आहे. पुंडलीक काळे यांनी विडब्लॉक नावाचे औषध आपल्या शेतात फवारले.
परंतु दुसऱ्याच दिवशी त्याची सर्व पिकं गळून गेल्यामुळे त्यांना मोठं नुकसान झाले. पंचनाम्यात उडीद, मूग, सोयाबीन, तूर या पिकांचे नुकसान झालं असून, 100 टक्के
पिकं गळून गेल्याची माहिती कृषी अधिकारी विजय सरोदे यांनी दिली.
तर, अशा बनावट औषधांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी तोटा सहन करावा लागतो. त्यामुळं त्यांच्या विक्रीवर वेळीच कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.