जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
महिलेला नग्न करून तिच्या गुप्तांगावर मारहाण करण्यात आली. बुलडाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला. गावकऱ्यांनीच ही मारहाण केली.
चोरीचा आरोप करत महिलेला नग्न केलं. आणि तिच्या गुप्तांगावर काठीनं मारहाण केली. त्यानंतर गावाच्या चौकात तिला टाकून देण्यात आलं.
महिलेसह तिच्या मुलालाही गावकऱ्यांनी मारलं. याप्रकरणी 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातल्या 19 जणांना अटक करण्यात आली.