जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील चांदुरबिस्वा गावातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. चांदुरबिस्वा गावात तब्बल 10 ते 12 दिवस वीज बंद आहे. वीज बंद असल्याने गावात संपूर्ण अंधार पसरला आहे. शेतकरी शेतात वीजेच्या अभावाने पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे पिके अगदी शेवटची घटका मोजत आहेत.
वीज बिल न भरल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चांदुरबिस्वा या संपूर्ण गावाची लाईन बंद केली आहे. याप्रकरणी कॉंग्रेस आक्रमक झाले आहे. कॉंग्रेसचे मलकापूरचे नगराध्यक्ष हरिश रावळ यांनी गावात पोलवर चढून कनेक्शन सुरु केले आहे.
लाईट बंद केली तर अधिकाऱ्यांना फटके देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.