भेंडीबाजारमध्ये 5 मजली इमारत कोसळली, मृतांच्या संख्येत वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई घाटकोपरमध्ये झालेल्या साईदर्शन इमारतीची दुर्घटना ताजी असतांनाच गुरुवारी भेंडीबाजारमध्ये जेजे मार्ग परिसरात 5 मजली  हुसेनी इमारत कोसळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफचं पथक दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.   या दुर्घटनेत 15 जण […]

भेंडीबाजारमध्ये 5 मजली इमारत कोसळली, मृतांच्या संख्येत वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

घाटकोपरमध्ये झालेल्या साईदर्शन इमारतीची दुर्घटना ताजी असतांनाच गुरुवारी भेंडीबाजारमध्ये जेजे मार्ग परिसरात 5 मजली 

हुसेनी इमारत कोसळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफचं पथक दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या

रहिवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये 5 पुरुष आणि 2

महिलांचा समावेश आहे.

 

या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भेंडीबाजारमध्ये ‘हुसेनी’ इमारत कोसळल्यामुळे

शेजारील इमारतींनाही तडे गेले आहेत. 100 वर्षांपुर्वीची ही इमारत असून धोकादायक इमारतींच्या यादींमध्ये या इमारतीचा समावेश आहे.

ढिगाऱ्याखाली 30 ते 35 जण अडकल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. जखमींचा आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number