पोलिसांच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने केली आत्महत्या

नालासोपारा येथील एका बिल्डरने मीरा, भाईंदर आणि वसई-विरार आयुक्तालयातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने केली आत्महत्या

जयराज राजिवडे. प्रतिनिधी. वसई: नुकताच, बुलढाणा येथील दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार ताजे असतानाच मुंबईतील नालासोपारा येथील एका बिल्डरने मीरा, भाईंदर आणि वसई-विरार आयुक्तालयातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयप्रकाश चौहान असं त्या बिल्डरचं नाव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी शाम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव लिहून, 'आपल्या मृत्यूसाठी शाम शिंदे आणि राजेश महाजन हे हे पोलिस कर्मचारी जबाबदार आहेत', असं सांगितलं. या घटनेने नालासोपारामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

एक नव्हे तर चार फ्लॅट्सचा ताबा लिहून घेतला

नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मृत जयप्रकाश चौहान यांनी 'ओम श्री दर्शन' ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी पोलिस शिपाई श्याम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून 50 लाखांचे फायनान्स केलं होतं. एका वर्षात दुप्पट रक्कमेच्या आश्वासनावर चौहान यांनी पैसे दिले होते. तसेच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता.  

हेही वाचा: शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पैशासाठी बिल्डरकडे लावला तगादा

इमारत बांधकामास एक वर्षाहून अधिक वेळ झाल्याने पोलिस शिपाई शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी मृत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशाच्या मागणीचा तगादा लावला. जयप्रकाश यांनी 22 लाख ॲानलाईन आणि 10 लाख रोख रक्कम असे मिळून 32 लाख शाम शिंदेला दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं. मात्र तरीही शाम शिंदे आणि त्याचा सहकारी महाजनने जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास दिला. 

हेही वाचा: मद्यप्राशन करून भांडण केल्याने पत्नीने केला पतीचा खून

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

'ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यांत अडकवणार', अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयांनी केला. तसेच, शाम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चौहान यांनी अखेर राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. 'आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत', असं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. 'शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन, तसेच मध्यस्त लाला लजपत यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा', अशी मागणी चौहान कुटुंबीयांनी केली. 

मृत जयप्रकाश चौहान यांच्या मुलीची संतप्त प्रतिक्रिया

या घटनेबद्दल माहिती देताना मृत जयप्रकाश चौहान यांच्या मुलीने म्हणजेच गौरी चौहानने माहिती देताना सांगितलं की, 'आपल्या वडिलांनी ही इमारत बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु 35 लाख रुपये देऊनही बिल्डिंग घशात घालण्याचा प्रयत्न शाम शिंदे याने केला. ही बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा अशी धमकी शाम शिंदेने दिली. तसेच लाला लजपत याने घरी येऊन आपल्या वडिलांना धमकावले. त्याच्या फोन वरून शाम शिंदेने आपल्या वडिलांना धमकी दिली. त्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केली. शाम शिंदे, राजेश महाजन आणि लाला लजपत यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा'. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number