स्नेहल पावनाक , मुंबई : संगीत ( म्युझिक ) ही एकमेव अशी गोष्ट आहे. जी तुमच्या आनंदात, दु:खात, नैराश्यात तुम्हांला साथीला असते. बॉलीवूडही नेहमीच अनेक सदाबहार गाण्याचा उगम राहिलंय. सध्या जगभरात पॉप म्युझिकची चलती आहे. पॉप म्युझिकचं नातं अमेरिकन कलाकारांसोबत जास्त राहिलंय. मात्र, सध्या एका कोरियन बॉय बँड BTSची चर्चा सर्वाधिक आहे. भाषेची बंधने ओलांडत या बॉय बँडने आपल्या संगीत आणि गायकीनं जगभरातील चाहत्यांना वेड लावलंय. जर तुम्ही सध्याच्या ट्रेंडनुसार चालणारे असाल, तर तुम्हांला BTSबद्दल माहितं असायलाच हवं. त्यांचं नुकतंच रिलीज झालेलं ‘बटर’ ( BUTTER ) गाणं जगभरात गाजतंय. या गाण्यानं २४ तासात १०० मिलियन ( दशलक्ष ) व्ह्यू मिळवण्याचा नवा विक्रम नोंदवलाय. BTS अनेक विक्रम मोडणारे एकमेव आशियाई कलाकार बनले आहेत. भारतातही यांचे अनेक चाहते आहेत. नुकत्याचं पार पडलेल्या बिलबोर्ड म्युझिक अवार्डमध्ये BTS ने अनेक नामी पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. त्यामध्ये Top Duo/Group, Top Song Sales Artist, Top Social Artist या पुरस्कारांचा समावेश आहे. संगीत जगतातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ६३व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात BTSने नामांकन मिळवलं. या सोहळ्यात त्यांनी त्यांच्या ‘डायनामाईट’ या गाण्याचं सादरीकरणही केलं. हा मान मिळवणारे ते पहिले कोरियन कलाकार आहेत. कोण आहेत BTS ? BTS एक सात तरुण मुलांचा कोरियन बॉय बँड ग्रुप आहे. यांच्या कारकिर्दीची सुरुवात २०१३मध्ये झाली. त्यांचा पहिला अल्बम ‘नो मोर ड्रिम’सोबत त्यांनी कोरियन पॉप इंडस्ट्री के-पॉपमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर मागील ७ वर्षांत या ७ ध्येयवेड्या तरुणांनी खडतर प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या जगाला भुरळं पाडली. यांची गाण्यांमध्ये कोरियन आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेंचा संगम पाहायला मिळतो. मात्र त्यांच्या संगीतानं भाषेंतील अडथळे मोडतं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. आणि अर्थांतच यात त्यांना साथ दिली ती म्हणजे त्यांच्या चाहत्यांनी… BTS च्या चाहत्या वर्गाला ‘आर्मी’ संबोधले जाते. आर्मी म्हणजे BTSचा चाहतावर्ग या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा चाहतावर्ग त्यांच्या सदैव पाठिशी असतो. याच जगभरातील चाहत्या वर्गाने निधी उभारत भारताला कोरोनाविरोधी लढ्यात मदत केलीय. शिवाय वर्ण-भेदाविरोधी #blacklifematters मोहिमेत निधी उभारतही हातभार लावला. यावरूनचं BTSचं जागतिक स्तरावरील प्रभावी स्थान लक्षात येतं. येत्या काळातही BTSकडून नव्या जागतिक विक्रमांची अपेक्षा नक्कीच करता येईल.