भावानेच काढला बहिणीचा काटा…

भावाबहिणीचं नात हे अतूट मानले जाते. परंतु वसईमध्ये मात्र एका भावाने या नात्यालाच काळईमा फासला. रक्षाबंधानानंतर हातातील राखीही सुटली नसेल, एवढ्यात चक्क एका अल्पवयीन भावाने आपल्या सख्या मोठ्या बहिणीची गळा आवळून हत्या केली आहे. बहीण मित्रासोबत जास्त राहते आणि फोनवर जास्तवेळ बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून या भावाने हत्या केली असल्याचे उघड झाले आहे.  […]

भावानेच काढला बहिणीचा काटा…

भावाबहिणीचं नात हे अतूट मानले जाते. परंतु वसईमध्ये मात्र एका भावाने या नात्यालाच काळईमा फासला. रक्षाबंधानानंतर हातातील राखीही सुटली नसेल, एवढ्यात चक्क एका अल्पवयीन भावाने आपल्या सख्या मोठ्या बहिणीची गळा आवळून हत्या केली आहे. बहीण मित्रासोबत जास्त राहते आणि फोनवर जास्तवेळ बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून या भावाने हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. 

वसईतील पाळणापाडा येथील दुमडा चाळीत काल 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 

काजल पगारे असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव असून ती 18 वर्षांची होती.

हत्या करणारा आरोपी भाऊ हा तिच्याहून एक वर्षाने लहान म्हणजे  17 वर्षांचा आहे.

आरोपी विरोधात वालीव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number