Mumbai News : मोठी बातमी! मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने परिसरात खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाची घटनास्थळी धाव

मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरात बेवारस बॅग आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai News : मोठी बातमी! मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने परिसरात खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाची घटनास्थळी धाव

मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरात बेवारस बॅग आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बॉम्ब शोध आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल होत दोन्ही पथकांकडून बॅगेची तपासणी सुरू आहे, तसेच बॅगेत काही संशयास्पद वस्तू आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे. तसेच यावेळी मुंबादेवी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून नागरिकांना परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली. दरम्यान आढळलेल्या बॅगमध्ये काहीही संशयास्पद आढळले नसून मिळालेली बॅग रिकामी आहे. तसेच अज्ञात व्यक्तीकडून त्या ठिकाणी बॅग सोडण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number