वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलाय. भारतीय हवाई दलाच्या सुखोई या जेट विमानाच्या माध्यमातून ब्राम्होस मिसाईलची यशस्वी चाचणी करण्यात आलीये.
सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली.
विमानाच्या माध्यमातून ब्राम्होसची यशस्वी चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे भारताने ही चाचणी घेऊन इतिहास घडवला.
भारत आता एकमेव असा देश आहे ज्याच्याकडे जमिन, पाणी आणि हवेतून मारा करणारी सुपरसोनिक मिसाईल आहे.