कॉफीपेक्षा महागात का पडली स्टारबक्सची जाहिरात ?

मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : भारतात सध्या ‘समलिंगी विवाहा’वर चर्चा सुरू आहेत. अशा वादग्रस्त परिस्थितीत कॉफीहाऊस कंपनी स्टारबक्सनं याच मुद्द्यावर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आणि याच जाहिरातीमुळे स्टार बक्सच्या अडचणीत वाढ झाली. ही जाहिरात पाहून ‘स्टारबक्सची जाहिरात भारतात ‘समलैंगिक विवाहांना’ प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून केला जातोय. काय आहे प्रकरण? 10 मे रोजी […]

कॉफीपेक्षा महागात का पडली स्टारबक्सची जाहिरात ?

मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : भारतात सध्या ‘समलिंगी विवाहा’वर चर्चा सुरू आहेत. अशा वादग्रस्त परिस्थितीत कॉफीहाऊस कंपनी स्टारबक्सनं याच मुद्द्यावर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आणि याच जाहिरातीमुळे स्टार बक्सच्या अडचणीत वाढ झाली. ही जाहिरात पाहून ‘स्टारबक्सची जाहिरात भारतात ‘समलैंगिक विवाहांना’ प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून केला जातोय.

काय आहे प्रकरण?
10 मे रोजी स्टारबक्सनं ‘#ItStartsWithYourName’ या हॅशटॅगसह सोशल मीडियावर एका जाहिरात प्रसारित केली. या जाहिरातीत स्टारबक्समध्ये एक वृद्ध जोडपं बसलेलं दिसतंय. ते आपला मुलगा अर्पितची वाट पाहत आहेत. पण अर्पितऐवजी अर्पिता येते.
आता यात अर्पिताच अर्पित आहे. जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या अर्पितनं त्याचं लिंग बदल करून घेतलं आणि तो मुलगी झाल्याचं दाखवलं आहे.
त्यामुळे ‘समलिंगी विवाहा’वर स्टारबक्सची ही जाहिरात पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि युजर्स भडकले. त्यांनतर बॉय कॉट स्टारबक्स हे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आहे. आता याचा नेमका काय परिणाम होणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत.

समलिंगी विवाहाची चर्चा का ?

पाच महिन्यांपूर्वी, दोन समलिंगी जोडप्यांनी विशेष विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर नोटीस जारी केली आणि जानेवारी 2023 मध्ये वेगवेगळ्या उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित असलेल्या सर्व याचिका हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या प्रकरणावर मत मांडायला सांगितले. मग केंद्र सरकारने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्याने वैयक्तिक कायदे आणि समाजाने स्वीकारलेल्या सामाजिक मूल्यांच्या नाजूक समतोलाला पूर्णपणे हानी पोहोचेल कारण भारतीय कुटुंबाची संकल्पना जैविक पुरुष आणि स्त्री यांचा समावेश करते. त्यामुळेच सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेला विरोध केला. त्यानंतर
याचिकाकर्त्यांनी त्यांच्या जीवनाचा अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेच्या अधिकाराचा मुद्दा धरून लोकांच्या लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर लग्न करणे टाळले जाऊ शकत नाही असे नमूद केले.त्यामुळे या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने भारतात समलैंगिक विवाह कायदेशीर करणे हा एक ‘महत्वाचा मुद्दा’ आहे आणि याचिकेवर पुढील निर्णय घेण्यासाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली. त्यामुळेया विषयावर चर्चा होऊ लागल्या. याच वादात आता स्टारबक्स अडकले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number