चिपळूण येथील ‘वंदे भारत’च्या स्वागतावर बहिष्कार

कोकण, ३ जून २०२३, प्रतिनिधी :  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीच्या स्वागतासाठी रेल्वे प्रशासनाने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले. परंतू या गाडीला चिपळूण येथे थांबा नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाने बहिष्कार टाकला आहे. ८ दिवसांपूर्वी चिपळूणला थांबा देण्याचे निश्चित झाले होते. परंतू अचानक त्यात बदल करत खेडला थांबा देण्यात आला. चिपळुणमध्ये पाणी भरण्यासाठी ही […]

चिपळूण येथील ‘वंदे भारत’च्या स्वागतावर बहिष्कार

कोकण, ३ जून २०२३, प्रतिनिधी :  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीच्या स्वागतासाठी रेल्वे प्रशासनाने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले. परंतू या गाडीला चिपळूण येथे थांबा नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाने बहिष्कार टाकला आहे.

८ दिवसांपूर्वी चिपळूणला थांबा देण्याचे निश्चित झाले होते. परंतू अचानक त्यात बदल करत खेडला थांबा देण्यात आला. चिपळुणमध्ये पाणी भरण्यासाठी ही गाडी थांबत असल्याने तिला थांबा मिळावा, अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते आणि कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी पत्रकार परिषदेत दिला.

८ दिवसापर्यंत वंदे भारतला चिपळुणात थांबा मिळणार हे नक्की होते. परंतु अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या गाडीला चिपळुणात थांबा मिळण्यासाठी पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनी बहिष्कार टाकला आहे.येत्या काही दिवसात याबाबत सहकारी मित्र पक्षांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number