मैत्री, प्रेम, आत्महत्या, हत्या… गुन्ह्याची 24 तासांत उकल!

वीस वर्षीय तरुणीचा दिवसाढवळ्या राहत्या घरी खून झाल्याची घटना घड़लीय लातुरातील विशालनगर येथे घडली होती. अपूर्वा अनंत यादव या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आला होता. मित्राच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मैत्रीणीचा खून मित्रानेच केल्याचे तपासात उघड झालं आहे. लातूर शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या विशालनगर हादरले ते येथील अपूर्वा यादव या वीस वर्षीय तरुणीच्या हत्येने. […]

मैत्री, प्रेम, आत्महत्या, हत्या… गुन्ह्याची 24 तासांत उकल!

वीस वर्षीय तरुणीचा दिवसाढवळ्या राहत्या घरी खून झाल्याची घटना घड़लीय लातुरातील विशालनगर येथे घडली होती. अपूर्वा अनंत यादव या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आला होता. मित्राच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मैत्रीणीचा खून मित्रानेच केल्याचे तपासात उघड झालं आहे.

लातूर शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या विशालनगर हादरले ते येथील अपूर्वा यादव या वीस वर्षीय तरुणीच्या हत्येने. दिवसाढवळया घरात घुसून केलेल्या या हत्येने शैक्षिणक पटर्न साठी नावाजलेले लातूर ढवळून निघाले. लातूर पोलिसांनी पाच पथकं तयार केली.त्यात एमआईडीसी पोलिस ठाण्याचे दोन, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन आणि सायबर सेलची टीम कामाला लागली आणि अवघ्या 24 तासाच्या आता पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. अपूर्वाचा खून तिच्या मित्रानेच केल्याचं उघड झालंय. अमर शिंदे असं खुन्याचं नाव आहे.

 

 

 

 

काय घड़लं होतं?

अपूर्वा यादव, सार्थक जाधव आणि अमर शिंदे हे अनेक वर्षापासूनचे मित्र होते. यात अपूर्वाचे आणि सार्थक याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र नंतर दोघांमध्ये काही वाद झाले आणि यातूनच सार्थकने आत्महत्या केली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिस ठाण्यात सार्थकच्या वडिलांनी अपूर्वाच्या दिलेल्या त्रासाने सार्थकने आत्महत्या केल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. याचा परिणाम अमर आणि अपूर्वाच्या मैत्रीवरही संबधवर झाला होता. याचे पडसाद अमर आणि अपूर्वाच्या भेटीत उमटले. आपल्या मित्राच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या अपूर्वाची हत्या अमरने केली.

खून केल्यावर अमर अपूर्वाचा आणि तिच्या आईचा मोबाइल घेऊन गेला. त्यात अपूर्वा आणि त्याचे फोन कॉल आणि मॅसेजही होते. पोलिसंनी मोबाइल ताब्यात घेतले आहेत. अमर शिंदे यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number