जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली
डोंबिवलीतील ठाकुरवाडी परिसरात एका लहान मुलाचा इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाला. ऋषिकेश काळे असं मृत झालेल्या मुलाच नाव आहे.
ठाकुरवाडी परिसरातील ज्ञान प्रसाद या इमारतीत ही दुर्देवी घटना घडली. दुपारच्यावेळी ऋषिकेश गच्चीवर खेळायला गेला होता.
त्यावेळी ऋषिकेश इमारतीच्या गच्चीवरून डोकावत असताना अचानक त्याचा तोल जावून तो खाली पडला. आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची विष्णु नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.