महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून पुस्तक

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दिवसेंदिवस राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून पुस्तक सादर करण्यात आले आहे. महिला सुरक्षेसाठीचा पुस्तक सादर करण्याचा प्रयत्न अमरावती शरह सायबर पोलिसांच्यावतीने राबविण्यात येत आहे. महिलांनी स्व-सुरक्षेसाठी नेमकं काय करावे, सायबर गुन्हेगारांपासून बचाव कसा करावा, निर्भया आणि सर्व धर्म समभाव ही चार […]

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून पुस्तक

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दिवसेंदिवस राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून पुस्तक सादर करण्यात आले आहे. महिला सुरक्षेसाठीचा पुस्तक सादर करण्याचा प्रयत्न अमरावती शरह सायबर पोलिसांच्यावतीने राबविण्यात येत आहे.

महिलांनी स्व-सुरक्षेसाठी नेमकं काय करावे, सायबर गुन्हेगारांपासून बचाव कसा करावा, निर्भया आणि सर्व धर्म समभाव ही चार पुस्तके पोलिसांनी सादर केली आहेत. अमरावतीमध्ये आठ हजार पुस्तकांद्वारे पोलीस नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. तर या पुस्तकांचे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे.

अमरावतीमध्ये अलीकडे महिला हिंसाचाराची घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हिंसाचाराच्या घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून पोलिसांकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व धर्म समभाव राखण्यासाठी आवश्यक माहिती असलेली पुस्तके प्रकाशित केली असून त्याचे विनामूल्य वितरण करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number