उच्च न्यायालयाचा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे. गद्दार टिप्पणीप्रकरणी दाखल एफआयआरवर अंतिम निर्णय होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च न्यायालयाचा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा

मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला बॉम्बे हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. स्टँडअप कॉमेडी शो मध्ये त्याने विडंबनात्मक टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरच्या पार्श्वभूमीवर, हायकोर्टाने कामराला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत त्याला अटक करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट नामोल्लेख न करता त्यांच्यावर 'गद्दार' अशी टिप्पणी केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कामराविरोधात गुन्हा नोंदवून अनेक वेळा समन्स बजावले. मात्र, कामरा चौकशीसाठी हजर झाला नाही.

हेही वाचा:मुंबईतील काही भागात शनिवार-रविवारी पाणीकपात; महापालिकेची जलवाहिनीसंबंधी कामे

या सगळ्या घडामोडींनंतर, कुणाल कामराने स्वतःविरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कुणाल कामराच्या वकिलांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आणि हा विनोदाचा भाग होता, असे सांगितले. न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत, कामराविरोधातील गुन्हा रद्द करण्याबाबत याचिका स्वीकारली आणि ती प्रलंबित असतानाच त्याला अटक न करण्याचे आदेश दिले.

मात्र, हायकोर्टाने तपासावर स्थगिती देण्यास नकार दिला असून, मुंबई पोलिसांना आपली चौकशी सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे कामराला अद्याप चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

या निर्णयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकीय व्यक्तींवर टीका करणे हा विनोदाचा भाग आहे की कायद्याचा भंग यावर समाजातील मतविभाजन पाहायला मिळत आहे. कुणाल कामरावरील ही कारवाई आणि त्याविरोधातील न्यायालयीन लढाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या सीमारेषांवर एक महत्त्वपूर्ण उदाहरण ठरू शकते. पुढील सुनावणींमध्ये न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number