मुंबई, ३० जुलै २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी घटस्पोटाचा निर्णय घेतला. अरबाज खान – मलायका अरोरा, हृतिक रोशन – सुझान खान, सोहेल खान – सीमा सजदेह यांच्या घटस्फोटानंतर बॉलिवूडच्या आणखी एका कलाकार जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता फरदीन खान आणि पत्नी नताशा माधवानी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. , फरदीन आणि नताशा यांच्या खासगी आयु्ष्यात सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. फरदीनची पत्नी नताशा हिने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे… असं देखील सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे हे दोघे गेल्या काही दिवसांपासून विभक्त राहत राहत होते. फरदीन आईसोबत मुंबईत तर नताशा लंडनमध्ये राहत आहे.अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या एक वर्षापासून दोघे एकत्र राहत नाहीत. तसेच अद्याप दोघांनी देखील घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका देखील मांडलेली नाही. त्यामुळे ते खरंच विभक्त होणार का? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.