रॅश ड्रायव्हिंग करत दिली धडक, आदित्य नारायणला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रॅश ड्रायव्हिंग करत रिक्षाला धडक दिल्यामुळे मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी कारवाई केली. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत. अंधेरीतील लोखंडवालाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर आदित्य नारायणने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, अपघातात […]

रॅश ड्रायव्हिंग करत दिली धडक, आदित्य नारायणला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रॅश ड्रायव्हिंग करत रिक्षाला धडक दिल्यामुळे मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी कारवाई केली.

या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत. अंधेरीतील लोखंडवालाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर आदित्य नारायणने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

मात्र, अपघातात जखमी झालेल्या महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय. जखमी रिक्षा चालकाचं नाव राजकुमार बाबूराव असून ते 64 वर्षांचे आहेत. कोकिळाबेन रुग्णालयात ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number