जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘आप की अदालत’ कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे अभिनेत्री कंगना राणावत जोरदार चर्चेत आहे.
आपलं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणून, दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल हृतिकने माफी मागावी, अशी जाहीर मागणी कंगनाने केली आहे.
‘आप की अदालत’चा टीझर रिलीज झाला असून त्यामध्ये कंगनाने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
त्याला इकडे बोलवा आणि एक-एक प्रश्न विचारा. कारण, मी नोटीस नव्हती पाठवली; मी इतकी मानहानी सहन केली आहे, की त्याचा ताळेबंदच लागणार नाही.
मी रात्रभर रडत बसायचे आणि मला झोप यायची नाही. मला ताण आला, माझ्यावर मानसिक आघात झाले. माझ्या नावावर वाह्यात मेल्स जाहीर केले. आजही ते मेल लोक गूगल करुन वाचतात आणि मजा घेतात. या गैरवर्तनासाठी माझी माफी मागावी, असं कंगनाने टीझरमध्ये म्हटलं आहे.