मुंबई, 26 मे: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडला एक मोठा धक्का बसला होता. सुशांतने फार कमी वेळात प्रसिद्ध मिळाली होती. अनेकजण सोशल मीडियावर सुशांतचे फोटो शेअर करत असतात. तसेच 24 तारखेला ‘ब्रदर्स डे’ (Brother’s Day) होता. यामुळे सुशांतच्या बहिणीला त्याची प्रचंड आठवण येत होती. त्याचंबरोबर ‘पवित्र रिश्ता’ फेम आणि सुशांतचा जवळचा मित्र असणाऱ्या महेश शेट्टीला सुद्धा आपल्या मित्राची खूप आठवण आल्यामुळे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुशांतबरोरचे जुने फोटो शेअर केले होते. हे फोटो सध्याला व्हायरल झाले आहेत. हा महेश शेट्टी हा सुशांतचा जवळचा मित्र होता. त्यांनी ‘पवित्र रिश्ता’ मध्ये एकत्र काम केल होतं. या दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली होती, की ते एकमेकांना भाऊ समजत होते. इतकचं नव्हे तर सुशांतने शेवटचा संवाद देखील महेश सोबतचं साधला होता. त्यांचं हे नातं खुपचं खास होतं. ब्रदर्स डेचं निमित्त साधत महेशने सुशांतसोबतचा आपला जुना फोटो इन्स्टा स्टोरीला शेयर केले होते. महेश अनेकदा सुशांतच्या आठवणीत रमलेला असतो. या फोटोत दोघे सोबत आहे आणि आनंदी दिसत आहे. तसेच 21 मे 2020 मध्ये सुशांतने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करत महेशला शुभेच्छा देत लिहिलं होतं, ‘हॅप्पी बर्थडे मेरी जान’. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये हे कलाकार एकत्र आले होते. या मालिकेदरम्यान त्यांच्यात एक विशिष्ट नात निर्माण झालं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतरही हे नातं असचं टिकून आहे.