जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना नानावटी रूग्नालयात दाखल केले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकारावरील उपचारासाठी त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करून घेण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मात्र यासंदर्भात अधिक माहिती द्यायला नकार दिला.
सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना हृदया संबधित त्रास जाणवत होता. राजकुमार संतोषी यांनी श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं होतं. संध्याकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
राजकुमार संतोषी यांनी गोविंद निहलानी यांच्या ‘अर्धसत्य’ पासुन चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी ‘घायल’, ‘दामिनी’, ‘अंदाज अपना अपना’, ‘पुकार’, ‘लज्जा’, ‘खाकी’, ‘अजब प्रेम कि गजब कहानी’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’, ‘दि लेजेंड ऑफ भगत सिंग’, यासारख्या अनेक हिट सिनेमांच दिग्दर्शन त्यांनी केली. ‘दि लेजेंड ऑफ भगत सिंग’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मानकरी ठरला होता. ‘पुकार’ चित्रपटासाठी राजकुमार संतोशी यांना राष्ट्रीय एकतेचा नर्गिस दत्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. राजकुमार संतोषी सध्या ‘बॅटल ऑफ साराग्रही’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात रणदीप हुडा प्रमुख भूमिकेत दिसेल.