कलाप्रेमी, शास्त्रीय नृत्यांगणा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेली बॉलीवूडची अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिने एककेळी हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती. तिच्या सौंदर्यावर, फक्त नावावर तिला चित्रपट मिळत आहे. 90 च्या काळातील ही या अभिनेत्रीने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 1983 मध्ये सुभाष घाई दिग्दर्शीत हिरो चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या मीनाक्षी अनेक हिट चित्रपट दिले. घातक, घायल, शेहनशाह यांसारख्या तिच्या काही मोजक्या चित्रपटांमधील मीनाक्षीचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान, स्त्री केंद्रीत दामिनी हा चित्रपट मीनाक्षीच्या करिअरमधील माइलस्टोर ठरलेला चित्रपट मानला जातो. मात्र ही बहुगुणी अभिनेत्री आज पुन्हा चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक, फिल्ममेकर्सकडे विनंती करत आहे. तिने संबंधीत व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
काय म्हटलं आहे मीनाक्षीने –
प्रिय मित्रांनो, हा संदेश अमेरिकेतील बोस्टनमधून तुम्हा सर्वांसाठी आहे. मी माझ्या मुलाच्या हार्वर्ड विद्यापीठातील पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आणि माझ्या कुटुंबासोबत उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवण्यासाठी येथे आले आहे.
मला हे सांगायचे आहे की, भारतात स्थलांतरित झाल्यानंतर मी मनोरंजन क्षेत्रात अधिक संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जरी मला काही संधी मिळाल्या असल्या, तरी त्या एकतर पुरेशा आकर्षक नव्हत्या किंवा त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मी तुम्हा सर्व अद्भुत चाहत्यांकडून शुभेच्छा आणि आशीर्वादांची अपेक्षा करत आहे.