जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
मोहक हास्य आणि तितक्याच कसदार अभिनयानं प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या ‘धकधक गर्ल’ अर्थात, माधुरी दिक्षित अभिनीत बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे माधुरी मराठी चित्रपटसृष्ट्रीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची खासीयत येथेच संपत नाही तर त्यामध्ये माधुरीबरोबर पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत रणबीर कपुर देखील दिसणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, त्या दरम्यान खुद्द माधुरीने या बातमीचा गौप्यस्फोट केलाय.
रणबीर कपुर अभिनीत, यह जवानी है दिवानी या चित्रपटात माधुरी ऐका गाण्यादरम्यान झळकली होती. त्या दरम्यान रणबीरच्या अभिनयक्षमतेने प्रभावित झालेल्या माधुरीने, रणबीरचे नाव बकेट लिस्ट या चित्रपटासाठी सुचवल्याचे तिने या कार्यक्रमादरम्यान जाहीर केले.