जय महाराष्ट्र न्युज, मु्ंबई
अभिनेत्री सोनम कपूर लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत सोनम लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.सोनमच्या लग्नासाठी कपूर आणि सन्स जोरदार तयारीला लागले होते. सोनम कपूरच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली अशून सोनमच्या लग्नाच्या विधी आता सुरू झाल्या आहेत.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, दिग्दर्शक करण जोहर हे कपूर कुटुंबियांशी अगदी जवळचे संबंध असल्याने सकाळपासूनच ही मंडळी सोनमच्या लग्नाला पोहोचली आहेत. सोनमची वेडिंग सेरेमनी तिची जवळची नातेवाईक आणि इंटेरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडत आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जात आहेत. आनंद अहुजा हा दिल्लीचा असल्यामुळे मुंबईनंतर दिल्लीतदेखील सेलिब्रेशन होणार आहे. दिल्लीत जंगी रिसेप्शन दिले जाणार आहे.
आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून आहे. मात्र सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघीनीही नाते प्रायव्हेट ठेवले होते. मात्र त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. आनंद देशातील सर्वात मोठ्या एक्सपोर्ट हाउस म्हणजे शाही एक्सपोर्टचे मालक हरिष आहुजाचा यांचा मुलगा आहे. आनंद या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. हा त्याचा फॅमिली बिझनेस आहे. मुंबईत ते आज लग्नबंधनात अडकत असून त्यांची संगीत आणि मेहेंदी सेरमनी देखील गाजावातात झाली. रविवारी संध्याकाळी सोनमच्या हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला होता.