जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘महाबीज’कडूनही बोगस बियाणांचं वाटप करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘महाबीज’कडून देण्यात आलेल्या सोयाबीनच्या बियाणांचं पीक उगवलंच नसल्याची माहिती समोर आली आहे.
‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत या सोयाबीन बियाणांचं वाटप करण्यात आलं होतं. त्यामुळे आता बियाणंच बोगस, तर शेतकरी समृद्ध कसा होणार? हा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, महाबीजच्या पोत्यांवर बियाणांची माहिती नाही. त्यामुळे कृषी विभागानं फसवणूक केल्याचा शेतकऱ्याचा आरोप होत आहे. सरकारी बीज निर्मिती कंपनीही शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला जात आहे.