तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात असलेल्या अडसरे बु या गावाच्या करंजी नावाच्या शेतात भाताच्या तनसाच्या गंजीजवळ एक २७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला होता. ही तरुणी कोण आहे?, तिची हत्या का आणि कुणी केली? याबाबत अनेक तर्क-वितर्क करण्यात येत होते. प्रारंभी घोटी पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामिण अप्पर […]

तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात असलेल्या अडसरे बु या गावाच्या करंजी नावाच्या शेतात भाताच्या तनसाच्या गंजीजवळ एक २७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला होता. ही तरुणी कोण आहे?, तिची हत्या का आणि कुणी केली? याबाबत अनेक तर्क-वितर्क करण्यात येत होते. प्रारंभी घोटी पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती.

या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामिण अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन या युवतीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सूचना दिल्या. दरम्यान, तरुणीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. मयत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिसात याबाबत अज्ञात संशयितांविरोधात भादवी कलम ३०२, ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तरुणीला ठार मारण्यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याबाबतही स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा पोलीस प्रशासन तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number