जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बृद्धी आणि बळाच्या जोरावर कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो अशीच एक बळाची स्पर्धा गोरेगाव पश्चिम मध्ये असलेल्या न्यू सिद्धार्थ नगर मैदाना मध्ये रंगली घेण्यात आली. ही खुली शरीर सौष्ठव स्पर्धा 11-2-18 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 100 गट सहभागी झाले होते.
दरवर्षी ही स्पर्ध आयोजित करण्यात येते. युवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते त्यांना फिट राहण्याच महत्व कळाव हे या स्पर्धे मागचे वैशिष्ट आहे. ही स्पर्धा शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पाध्ये यांनी आयोजित केली होती त्याच बरोबर विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते या स्पर्धेच उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.