BMC Students Educational Trip: बीएमसीची शैक्षणिक सहल वादाच्या भोवऱ्यात; ८७ लाखांच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह

विद्यार्थ्यांना वरळी येथील नेहरू सेंटरला मोफत शैक्षणिक सहलीसाठी नेण्याचा प्रस्ताव असला, तरी सहल प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच या उपक्रमाच्या खर्च आणि कंत्राट प्रक्रियेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित

BMC Students Educational Trip: बीएमसीची शैक्षणिक सहल वादाच्या भोवऱ्यात; ८७ लाखांच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह

मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या 'नेहरू केंद्र एक झलक' या शैक्षणिक सहलीवरून वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना वरळी येथील नेहरू सेंटरला मोफत शैक्षणिक सहलीसाठी नेण्याचा प्रस्ताव असला, तरी सहल प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच या उपक्रमाच्या खर्च आणि कंत्राट प्रक्रियेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

87 लाखांच्या कंत्राटावरून आक्षेप
या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजन व्यवस्थेसाठी फुडलिंक (Foodlink) कंपनीला सुमारे 87 लाख रुपयांचे थेट कंत्राट देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी आक्षेप घेत निविदा प्रक्रिया डावलल्याचा आरोप केला आहे.

प्रशासनाचा 'मोनोपॉली'चा दावा
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, नेहरू सेंटर परिसरात कॅटरिंग सेवा पुरविण्याचा अधिकार केवळ फुडलिंक कंपनीकडे असल्याने ती "मोनोपॉली" सेवा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे खुली निविदा प्रक्रिया न राबवता थेट कंत्राट देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

निविदा नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव
मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार 3 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात ही अट शिथिल करण्यासाठी शिक्षण समितीकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे निविदा नियमांमध्ये सवलत देण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थायी आणि शिक्षण समितीसमोर प्रस्ताव
या संपूर्ण प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी तो स्थायी समिती आणि शिक्षण समितीसमोर सादर करण्यात आला आहे. समित्यांची मंजुरी मिळाल्यानंतरच सहलीच्या आयोजनास अंतिम स्वरूप मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number