जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
येत्या रविवारी 13 ऑगस्टला सर्व महापालिका शाळा सुरू राहणार आहेत. 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील महानगरपालिका आणि खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
वाहतूक कोंडीत या परिसरातील शालेय विद्यार्थी अडकण्याची शक्यता असल्यानं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय विभागानं घेतला होता. मात्र, यावेळी त्या दिवशी होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान अन्य दिवशी भरुन काढण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मुलांचं शालेय नुकसान होऊ नये यासाठी येत्या रविवारी महापालिकेच्या सर्व शाळा सुरू राहणार आहेत.