जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या बंद पडलेल्या 35 शाळा खासगी संस्थेमार्फत पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
या शाळांची पूर्ण मालकी महापालिकेचीच राहणार असून मुख्याध्यापकही महापालिकेमार्फत नियुक्त केला जाणार आहेत.
मात्र, विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे तज्ञ शिक्षक खासगी संस्थेकडून नियुक्त केले जाणार आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. या शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला सोमवारी
मंजुरी मिळाली.
यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या माध्यमातून पालिकेकडे निविदेच्या माध्यमातून येणाऱ्या खासगी संस्थेची निवड करण्यात येणार असल्याचे महापौर विश्वनाथ
महाडेश्वर यांनी सांगितले.