फेरीवाल्यांसाठी BMC चा मोठा निर्णय, आता QR Code आधारित प्रमाणपत्र अनिवार्य

अर्थसंकल्पात फेरीवाल्यांसाठी नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता  अधिकृत फेरीवाल्यांनाच आपले दुकान थाटता येणार आहे. 

फेरीवाल्यांसाठी BMC चा मोठा निर्णय, आता QR Code आधारित प्रमाणपत्र अनिवार्य

मुंबई महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या विरोधात मोहिम सुरू केली आहे. अनेक भागांमध्ये फेरिवाल्यांना बसण्यास मज्जाव घातला आहे. पण ही कारवाई जास्त दिवस राहणार नाही असा फेरिवाल्यांचा समज असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र त्यांना आता मोठा दणका बसणार आहे. याचे कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात फेरीवाल्यांसाठी नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता  अधिकृत फेरीवाल्यांनाच आपले दुकान थाटता येणार आहे. 

अधिकृत फेरीवाल्यांसाठी QR कोड
 नव्या फेरीवाला धोरणानुसार, अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी QR code आधारित प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. यापुढे मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच अनधिकृत आणि बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र होणार आहे. 

हेही वाचा – RBI Rules for Bank : 'ते ताबडतोब काढा…', आरबीयचे बॅंकाना आदेश, असं नेमकं काय घडलं?

करमणूक करही लागू होणार
त्याचप्रमाणे,  मुंबईत ऑक्टोबरपासून करमणूक करही लागू होणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून करमणूक शुल्कातून दिलेली सूट 30 सप्टेंबरपर्यंतच लागू असेल. त्यानंतर महापालिका करमणूक कर वसूल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number