जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
29 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
या प्रकरणी मुंबई पालिका स्थायी समिती बैठकीत विरोधक आक्रमक झाले.
29 सप्टेंबरला मुंबईत पाणी तुंबण्याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
700 कोटी खर्च करूनही उपाययोजना नसल्याने मुंबई तुंबली असल्याचा दावाही विरोधकांनी केला.
विरोधकांच्या आरोपांनतर आयुक्तांनी मात्र मुंबईकरांच्या तोंडाला पानेपुसणारे उत्तर दिले.
आपात्कालीन विभागाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत स्थायी समिती बैठक स्थगित करण्याचा प्रस्ताव विरोधकांनी मांडला.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाच्या नगरसेवकांचा सभा त्याग केला.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास आयुक्तांची पळकुटी भूमिका असल्याचा आरोपही सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.