BMC Corporator Mobile Allowance: नगरसेवकांना मोबाईल भत्त्याची थेट रक्कम मिळणार? बिलाची अट रद्द करण्याचा प्रस्ताव

आर-दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षा लीना देहेरकर यांनी यासंदर्भात पत्र दिले असून, आज होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

BMC Corporator Mobile Allowance: नगरसेवकांना मोबाईल भत्त्याची थेट रक्कम मिळणार? बिलाची अट रद्द करण्याचा प्रस्ताव

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मिळणाऱ्या मोबाईल भत्त्याबाबत आता नवीन प्रस्ताव समोर आला आहे. नगरसेवकांना मोबाईल बिलाची प्रत्यक्ष पूर्तता करण्याऐवजी निश्चित रक्कम थेट मानधनासोबत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आर-दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षा लीना देहेरकर यांनी यासंदर्भात पत्र दिले असून, आज होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना सध्या दरमहा 25 हजार रुपये मानधन मिळते. त्यासोबतच 2017 पासून नगरसेवकांना दरमहा 1,100 रुपये मोबाईल भत्ता देण्याची तरतूद आहे. मात्र हा भत्ता मिळवण्यासाठी सध्या काही पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मोबाईल बिल सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

हेही वाचा – Central Railway Delay: मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; गाड्या 20 मिनिटे उशिराने, प्रवाशांची तारांबळ 

विशेषतः सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि समिती अध्यक्षांना मोबाईल बिल सादर केल्यानंतर त्याची प्रतिपूर्ती केली जाते. मात्र बिल सादर करणे, त्याची पडताळणी आणि प्रतिपूर्तीची प्रक्रिया लांबलचक असल्याने अनेक नगरसेवक या सुविधेचा लाभ घेत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे मोबाईल बिलाची अट रद्द करून सर्व नगरसेवकांना निश्चित मोबाईल भत्ता थेट त्यांच्या मानधनासोबत देण्यात यावा, अशी मागणी लीना देहेरकर यांनी केली आहे. यामुळे नगरसेवकांना प्रत्येक महिन्याला मोबाईल बिल सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही आणि भत्त्याची रक्कम नियमितपणे मिळू शकेल. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या मानधन आणि विविध भत्त्यांशी संबंधित मुद्द्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मोबाईल भत्त्याबाबतचा हा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number