यंदाचं बजेट १४. ५२ टक्क्यांनी वाढलं

शनिवारी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या अर्थसंकल्पातून सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, अशीच मुंबईकरांची अपेक्षा होते. दरम्यान, गेल्यावर्षी ४५ कोटी ९४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. तर यंदा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी […]

यंदाचं बजेट  १४. ५२ टक्क्यांनी वाढलं

शनिवारी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या अर्थसंकल्पातून सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, अशीच मुंबईकरांची अपेक्षा होते. दरम्यान, गेल्यावर्षी ४५ कोटी ९४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. तर यंदा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला.

५२,६१९.०७ कोटी रुपये प्रस्तावित आहे, जो २०२२-२३ च्या ४५,९४९.२१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकापेक्षा १४.५२ टक्क्यांनी अधिक आहे. 1985 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका संस्थेच्या प्रशासकाकडून बजेट सादर करण्यात आला कारण त्यांच्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपला होता. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा बजेट प्रशासकाकडून सादर केला गेला.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तोट्यात अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number