जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
2001 पासून रेल्वेनं मुंबई महापालिकेचं पाणी बिल भरले नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघड झालीय.
पश्चिम रेल्वेकडे 205 तर मध्य रेल्वेकडे 161 कोटी रुपये थकबाकी आहे. रेल्वेकडे मुंबई महापालिकेचे 366 कोटी रुपये थकबाकी आहेत.
सामान्य माणसाचं पाणी तोडणारी मनपा रेल्वेबाबचत गप्प का? तसेच नियमानुसार दंडासह का वसूली केली जात नाही ?असा सवालही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय.