अमरावती सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

अमरावतीत सध्या सरकारी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, टी बी रुग्णालयात सध्या सक्तसाठा कमी असल्याचं सांगण्यात आले आहे. रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची रक्तासाठी गैरसोय होताना दिसते आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सामाजिक संघटनांनी आणि रक्त दात्यानी रक्तदान करण्याचं करण्याचं आव्हाहन जिल्हा शल्य चिकित्सक […]

अमरावती सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

अमरावतीत सध्या सरकारी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, टी बी रुग्णालयात सध्या सक्तसाठा कमी असल्याचं सांगण्यात आले आहे. रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची रक्तासाठी गैरसोय होताना दिसते आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सामाजिक संघटनांनी आणि रक्त दात्यानी रक्तदान करण्याचं करण्याचं आव्हाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौ यांनी केलं आहे.

इर्विनमधील रक्तपेढी ही एकमेव शासकीय रक्तपेढी असून या रक्तपेढीला जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, टीबी हॉस्पिटलसह जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांना रक्तपुरवठा करावा लागतो. १२ मार्चला या रक्तपेढीमध्ये शेवटचे रक्तदान शिबिर झाले होते. तेव्हापासून एकही शिबिर नसल्याने सामाजिक संघटनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number