पिण्याच्या पाण्यात रक्त आणि मांस!

विरार येथील मनवेलपाडा तलावाशेजारील शिवशक्ति चाळीत सोमवारी सकाळी आलेल्या पिण्याच्या पाण्यात रक्त, मांस, बकऱ्याची विष्ठा आणि केस आल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण होते. या बाबत नागरिकांनी पाहणी केली असता जवळच्याच तनुष्का या मटण शॉपवाल्याने गटारावाटे मुख्यजलवाहिनीतून बेकायदा पाण्याचे कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आले. या कनेक्शनवर पंप लावून मटण शॉपचा मालक उमेश कलाल पाणी खेचत होता. मात्र या […]

पिण्याच्या पाण्यात रक्त आणि मांस!

विरार येथील मनवेलपाडा तलावाशेजारील शिवशक्ति चाळीत सोमवारी सकाळी आलेल्या पिण्याच्या पाण्यात रक्त, मांस, बकऱ्याची विष्ठा आणि केस आल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण होते. या बाबत नागरिकांनी पाहणी केली असता जवळच्याच तनुष्का या मटण शॉपवाल्याने गटारावाटे मुख्यजलवाहिनीतून बेकायदा पाण्याचे कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आले.

या कनेक्शनवर पंप लावून मटण शॉपचा मालक उमेश कलाल पाणी खेचत होता. मात्र या पाण्याच्या कनेक्शनचा पाइप निघाल्याने मटन शॉपमधून निघणारे बकऱ्याचे रक्त, मांस आणि विष्ठा मुख्य जलवाहिनीत मिसळली.

रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका संगीता भेरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तर दुकानदार दुकान बंद करुन निघून गेला होता.

एकीकडे पाण्यासाठी विरारकरांना झुंझावे लागत असताना या संतप्त प्रकारामुळे अशी बेकायदा पाणी कनेक्शन दुकानदारांना मिळतातच कशी, असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number